महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना 90% अनुदानावर शिलाई मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही योजना विशेषतः अनुसूचित जातीच्या महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेद्वारे आर्थिक अडचणींमुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करू न शकणाऱ्या महिलांना मोठा आधार मिळणार आहे. राज्यभरात शिलाई मशीन अनुदान योजना सुरू असली तरी प्रत्येक जिल्ह्यात अर्ज स्वीकारण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. उदाहरणार्थ, जालना जिल्ह्यात 1 जुलै ते 30 जुलै 2025 या कालावधीत अर्ज स्वीकारले जात आहेत.
शिलाई मशीन अनुदान योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांना स्वावलंबी बनवणे आहे. शिवणकाम हे एक घरबसल्या करता येणारे काम आहे, या कामामुळे महिला आपल्या कुटुंबाला घरखर्च भागवण्यासाठी हातभार लावू शकतात.
शिलाई मशीन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
1.अर्जदार महिला अनुसूचित जाती प्रवर्गातील असावी.
2.अर्जदार महिलेचे वय किमान 18 वर्षे असावे.
3.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
4. याआधी शिलाई मशिन अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
5.सरकारमान्य प्रशिक्षण केंद्रातून शिलाई मशीनचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
6.कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय किंवा निमशासकीय सेवेत, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीत सदस्य नसावा.
शिलाई मशीन अनुदान योजनेचा अर्ज कसा करावा?
शिलाई मशीन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतींनी अर्ज करता येतो. जालना जिल्ह्यासाठी zp.jalna.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर योजनेची माहिती आणि अर्जाची लिंक उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्जासाठी वेबसाइटवरील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा, तर ऑफलाइन अर्जासाठी पीडीएफ फॉर्म डाउनलोड करून तो भरून संबंधित कार्यालयात सादर करावा. अर्ज भरताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, आर्थिक स्थिती आणि कुटुंबाची माहिती नमूद करणे आवश्यक आहे. अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी जोडावी असणे आवश्यक आहे.
शिलाई मशीन अनुदान योजनेसाठी लागणारे कागदपत्रे.
1.ग्रामसेवकाकडून मिळालेले रहिवासी प्रमाणपत्र.
2.कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
3.दारिद्र्यरेषेखालील (BPL) असल्याचे प्रमाणपत्र (लागू असल्यास).
4.यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र.
5.आधार कार्ड आणि आधार लिंक बँक पासबुकची झेरॉक्स.
6.तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून मिळालेले जाती प्रमाणपत्र.
7.सरकारमान्य प्रशिक्षण केंद्राचे शिलाई मशीन प्रशिक्षण प्रमाणपत्र.
8.10% रक्कम स्वतः भरण्याचे स्वतःलिहिलेले हमीपत्र.
शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील महत्त्वाच्या अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे:
अर्जदाराच्या कुटुंबाकडे स्वच्छतागृह असणे आवश्यक. कुटुंबातील कोणताही सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांचा सदस्य किंवा शासकीय सेवेत नसावा. वय सिद्ध करण्यासाठी शाळेची टीसी, आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र जोडावे.शिलाई मशीन दुसऱ्याला हस्तांतरित न करण्याचे हमीपत्र द्यावे.सर्व कागदपत्रे नीट तयार करून तालुका स्तरावरील महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात जमा करावीत.
शिलाई मशीन अनुदान योजनेचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
अधिकृत वेबसाइटवर जा आणि शिलाई मशीन योजनेची लिंक निवडा. अर्जदाराचे पूर्ण नाव, पत्ता, तालुका आणि जिल्हा त्या वेबसाईट वर टाका.अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्यास ‘होय’ निवडा.जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, वैवाहिक स्थिती आणि व्यवसायाची माहिती भरा.यापूर्वी योजनेचा लाभ घेतला नसल्यास ‘नाही’ निवडा.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आणि BPL स्थिती नमूद करा.आधार क्रमांक, बँक खाते तपशील, IFSC कोड आणि मोबाइल नंबर टाका.शिलाई मशीन प्रशिक्षण घेतल्यास ‘होय’ निवडा.सर्व माहिती तपासून ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
शिलाई मशीन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी इतर जिल्ह्यांसाठी माहिती
जालना जिल्ह्याबाहेरील महिलांनी आपापल्या जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधावा. प्रत्येक जिल्ह्यात अर्ज स्वीकारण्याच्या तारखा आणि पद्धती भिन्न असू शकतात. काही जिल्ह्यांमध्ये केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातात, तर काही ठिकाणी ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी स्थानिक कार्यालयातून योजनेची सविस्तर माहिती, पात्रता निकष आणि कागदपत्रांची यादी मिळवा आणि मगच योजनेचा अर्ज भरा.
शिलाई मशीन अनुदान योजना ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. शिलाई मशीनच्या माध्यमातून महिला घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत योगदान देऊ शकतात. यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल आणि आत्मविश्वास वाढेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी त्वरित अर्ज करावा आणि स्वयंरोजगाराच्या दिशेने पहिले पाऊल टाकावे.