महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना, राज्यातील सामाजिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांचे आर्थिक सहाय्य देणारी महत्त्वाकांक्षी सरकारी योजना आहे. 1 जुलै 2024 पासून माझी लाडकी बहिण योजना प्रत्यक्षात अमलात आली असून, तिचा उद्देश महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढवणे, महिलांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणे आणि त्यांना सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे.
माझी लाडकी बहिण योजनेची गरज आणि उद्दिष्ट
राज्यातील अनेक महिला आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यांवर अवलंबून असतात किंवा त्यांच्याकडे आर्थिक उत्पन्नाचे स्थिर साधन नसते. अशा महिलांना नियमितपने मासिक सहाय्य दिल्याने त्यांचा आत्मविश्वास, आरोग्य, शिक्षण किंवा कौटुंबिक गरजांमध्ये थेट मदत होते. याशिवाय महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देणाऱ्या धोरणांचा एक भाग म्हणून माझी लाडकी बहिण योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे
माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता व निकष
माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहेत:
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची स्थायी रहिवासी असावी.
- अर्जदार महिला ही 21 ते 65 वर्षे वयोगटातली असावी.
- कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रु. 2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
- महिलेकडे आधारशी लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.
कोणत्या महिला माझी लाडकी बहिण योजनेसाठी अपात्र ठरतात?
- कुटुंबातील कोणीही आयकर प्रदाता असल्यास अर्ज फेटाळला जाईल.
- सरकारी सेवेत कार्यरत (कायम, निवृत्त), किंवा अशा व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्य अर्ज करू शकत नाहीत.
- जवळपासच्या अन्य सरकारी योजनांतर्गत महिन्याला रु. 1,500 किंवा त्याहून अधिक आर्थिक लाभ मिळत असल्यास, अशा महिलांना ही योजना लागू होत नाही.
माझी लाडकी बहिण योजनेचे वैशिष्ट्ये
माझी लाडकी बहिण योजना 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेतर्गत प्रत्येकी 1,500 रुपये दरमहा पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा केला जातो.जुलै 2025 या महिन्यासाठी एकूण 2,984 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, येणाऱ्या 2-3 दिवसांत हप्त्यांचे पैसे खात्यावर जमा होण्याची शक्यता असल्याची माहिती अधिकृत स्तरावरून देण्यात आली आहे. शासनाचा हेतू म्हणजे महिलांना केवळ आर्थिक सहाय्य देणेच नव्हे, तर त्याद्वारे त्यांचे आरोग्य, पोषण, शिक्षण व सुरक्षितता यांना चालना मिळवणे आहे.
माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज कसा करावा?
माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज दोन पद्धतीनी केला जातो एक म्हणजे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया व दुसरे म्हणजे ऑफलाईन अर्ज प्रक्रिया.
माझी लाडकी बहिण योजनेची ऑनलाईन अर्ज प्रकिया पुढीलप्रमाणे.
सर्वप्रथम अधिकृत पोर्टलला भेट द्या: [www.ladakibahin.maharashtra.gov.in]. नोंदणी’ किंवा ‘Apply Online’ या विभागावर क्लिक करा.तुमचा मोबाइल नंबर नोंदवा व एक-वेळ पासवर्ड (OTP) मिळवा.वैयक्तिक माहिती, पत्ता, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार क्रमांक आणि बँक तपशील यांसारखी माहिती भरून अर्ज पूर्ण करा.आवश्यक कागदपत्रे PDF/JPEG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.संपूर्ण अर्ज सबमिट केल्यानंतर पुष्टी SMS किंवा ईमेल प्राप्त होईल.
मोबाईल अॅप (Narishakti Doot App):
माझी लाडकी बहिण योजनेची ऑफलाईन अर्ज सुविधा:
जिल्हा महिला व बालविकास विभागाचे कार्यालय, पंचायत समिती कार्यालये, महसूल मंडळ अथवा नोंदणीकृत सुविधा केंद्रांमधून ऑफलाईन अर्ज करता येतो.अर्ज सादर करताना आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईझ फोटो, बँक पासबुक आणि अन्य आवश्यक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.
सामान्य महिलांना माझी लाडकी बहिण योजनेचा फायदा कसा होणार?
समजा एका खेड्यात एक महिला राहतात. त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाल्यावर घर चालवणे कठीण झाले होते. ‘माझी लाडकी बहिण’ योजनेत मिळणारे 1,500 रुपये त्यांच्या मुलीच्या शाळेच्या फी, किराणा व औषधासाठी उपयोगी पडले.”अशा पद्धतीनी माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे त्या महिलेला उपयोगी पडले.
माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी महिला व बालविकास विभाग प्रमुख कार्यान्वित असून, वितरणासाठी आवश्यक निधी नियोजनपूर्वक वितरित केला जातो. जुलै 2025 च्या हप्त्यासाठी सरकारने 2,984 कोटी रुपयांचा निधी मान्यता दिली असून, त्याचे वितरण तांत्रिक प्रक्रियेनंतर लवकरच पूर्ण होणार आहे.
“माझी लाडकी बहीण” योजना ही महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी एक महत्वाचे पाऊल आहे. नियमित मासिक आर्थिक सहाय्य हे महिलांना स्वावलंबी होण्यासाठी मदत करत असून, त्या विविध गरजा स्वतःच्या पायावर उभ्या राहून पूर्ण करू शकतात. सर्व पात्र महिलांनी अधिकृत पोर्टल किंवा ‘नरिशक्ती दूत’ अॅपद्वारे तात्काळ अर्ज करावा. तसेच, अडचण असल्यास स्थानिक महिला व बालविकास कार्यालयास भेट देऊन मार्गदर्शन घ्यावे.