माझी लाडकी बहीण योजना 2025 जाणून घ्या पात्रता, 13वा हप्ता, आणि अर्जाची स्थिती”

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या कल्याणासाठी सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना ही एक उल्लेखनीय आणि प्रभावी योजना आहे. माझी लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. जमा झालेले पैसे महिला स्वतःच्या वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी, घरखर्च, किंवा इतर आवश्यक गरजांसाठी वापरू शकतात. माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य हेतू महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांना सशक्त करणे आहे.

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत12 हप्ते वितरित झाले आहेत, आणि आता यावेळेस 13व्या हप्त्याची तयारी सुरू आहे. सरकारने जाहीर केले आहे की, हा 13वा हप्ता जुलै 2025 मध्ये 24 तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा, काहीवेळा तांत्रिक कारणांमुळे पैसे मिळायला उशीर होऊ शकतो. अशा परिस्थितीत, ऑगस्ट 2025 च्या पहिल्या आठवड्यात हे पैसे खात्यात येण्याची शक्यता आहे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय आहे या योजनेसाठी खालील अटी पुर्ण कराव्या लागतात

1. महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी

.2. महिलांचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावं.

3.ती महिला आयकरदाता नसावी.

4.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे.

5.आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे.

6.बँक खाते DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) साठी सक्रिय असावे.

काही महिलांना मे किंवा जून महिन्यांचे थकित हप्ते मिळाले नसतील. अशा महिलांना जुलैच्या हप्त्यासोबत मागील थकीत रक्कम मिळू शकते. उदाहरणार्थ, जर दोन हप्ते थकले असतील, तर ₹4500 मिळू शकतात, आणि एक हप्ता थकला असेल तर ₹3000 मिळू शकतात.यादी आणि अर्जाची स्थिती तपासून तुमचे नाव योजनेसाठी पात्र यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत:तुमच्या गाव, वॉर्ड किंवा शहराच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.“नारी शक्ती दूत” मोबाइल अ‍ॅपद्वारे माहिती मिळवा. किंवा जवळच्या CSC केंद्रावर यादी पाहता येते.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही केलेले अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे तपासण्यासाठीladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जा. तिथे तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि “Application Status” विभागात सविस्तर माहिती मिळवा.13व्या हप्त्याचे तपशील या हप्त्याद्वारे सुमारे 2 कोटी 47 लाख महिलांना लाभ मिळणार आहे. मात्र, काही अर्ज चुकीच्या माहितीमुळे किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे नामंजूर होऊ शकतात. त्यामुळे तुमचे नाव यादीत आहे की नाही हे काळजीपूर्वक तपासा.संपर्कासाठी काही शंका किंवा अडचण असल्यास 181 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून माहिती मिळवता येईल.

माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्वाचे पाऊल आहे. पात्र महिलांनी आपली पात्रता, अर्जाची स्थिती आणि यादी नीट तपासावी. तसेच, हप्त्याची रक्कम वेळेवर जमा झाली आहे की नाही याकडे लक्ष द्यावे. ही योजना खऱ्या अर्थाने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी एक प्रभावी पाऊल आहे.

Leave a Comment