शेतकऱ्यांना लवकरच मिळणार पिक विमा योजनेची थकित रक्कम जाणुन घ्या संपुर्ण माहिती

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यात पिक विमा योजनेचे पैसे जमा होणार आहेत. खरीप हंगाम 2024 साठी सरकारने पिक विम्यासाठी 400 कोटी रुपयांची व्यवस्था केली होती. पण त्यापैकी 207 कोटी रुपये अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. आता सरकारने सांगितलंय की पुढच्या 15 दिवसांत हे पैसे शेतकऱ्यांना मिळतील.या विषयावर नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या बैठकीत चर्चा झाली होती.

शेतकरी बराच काळ पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत होते. आता शेतकऱ्यांना आशा आहे की लवकरच त्यांच्या बँक खात्यात विम्याचे पैसे येतील.सरकारने विम्यासाठी आपलं योगदान वेळेवर दिलं नाही, त्यामुळे विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि उशीर केला.

खरीप पिकासाठी 2024-25 साली 260 कोटी रुपये आणि मागील वर्षी, म्हणजे 2023-24 साली 262 कोटी रुपये अजूनही थकीत आहेत.नियमाप्रमाणे, विमा मंजूर झाल्यावर 10 दिवसांत शेतकऱ्यांना पैसे मिळायला हवेत. पण सरकार आणि विमा कंपन्यांमधील गोंधळामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळायला उशीर होतो. याचा सर्वात जास्त त्रास शेतकऱ्यांना होत असतो.

बरेच शेतकरी खते, बियाणे आणि इतर शेतीच्या कामासाठी कर्ज काढतात. जर विम्याचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत, तर त्यांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं.या सगळ्यामुळे सरकारने पैसे वेळेवर देण्यासाठी कडक नियम बनवले पाहिजे. आणि विमा कंपन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी.शेती हा आपल्या देशाचा कणा आहे.जर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे वेळेवर मिळाले तर शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी कर्ज काढावं लागणार नाही आणि शेतकऱ्याची सर्व कामे वेळेवर पूर्ण होऊन शेतकऱ्याची बचत होईल.

Leave a Comment