अवकाळी पावसाने पिकांचं नुकसान? आता सरकार तुमच्या पाठीशी उभी!”

मागील काही वर्षांपासून राज्यात हवामानाचा लहरीपणा वाढला आहे. विशेषतः अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहेत. शेतकरी दिवस रात्र शेतात कष्ट करतात.आणि अचानक आलेल्या गारपिटीमुळे सगळं वाया जातं.शेतकऱ्यांनी मेहनतीने उगवलेलं पीक खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून पंचनामे करून नंतर मदत जाहीर केली जाते.महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मदतीचा मोठा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने नुकतेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी आर्थिक मदत जाहीर केली असून त्याचा मोठा फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिल्ह्यातील ३९९८ शेतकऱ्यांना एकूण ३८१.२२ लाख रुपये इतकं नुकसान भरपाईचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

राज्यात फेब्रुवारी ते मे २०२५ या काळात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने एकूण ३ लाख ९८ हजार ६०३ शेतकरी घायाळ झाले होते. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ३९९८ शेतकऱ्यांचे पिकांचं मोठं नुकसान झालं. सरकारने पंचनामे तयार करून शेतकऱ्यांचे नुकसान नोंदवले आणि आता प्रत्यक्ष मदतीचा निर्णय घेतला आहे.

याआधी फक्त १२ नैसर्गिक आपत्तींसाठीच सरकारचीमदत मिळत होती. मात्र आता अवकाळी पाऊस, वीज पडल्यावर, वादळ, आग व समुद्राचं उधाण यासारख्या स्थानिक आपत्तींनाही मदतीच्या चौकटीत समाविष्ट करण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळेल?

शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे आर्थिक मदत मिळणार आहे:

  • कोरडवाहू शेतीसाठी: प्रति हेक्टर ₹८,५००
  • बागायत क्षेत्रासाठी: प्रति हेक्टर ₹१७,०००
  • बहुवार्षिक फळबागेसाठी: प्रति हेक्टर ₹२२,५००

हे पैसे शेतकऱ्यासाठीच आहेत. शेती करायचं, पण त्यासाठी आधार लागत असेल, तर सरकार आधार देतंय या योजनेमार्फत मिळणाऱ्या मदतीमुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे .

तुम्ही पात्र असाल आणि अजूनही अर्ज केलेला नसेल, तर आजच करा. गावातल्या इतरांनी या योजनेचा फायदा घेतलाय, आता तुमची बारी.

Leave a Comment