बांधकाम कामगार गृहनिर्माण योजना, १ लाख रुपये घर बांधणीसाठी अनुदान | Maharashtra Housing Scheme

महाराष्ट्र बांधकाम कामगार गृहनिर्माण योजना ही महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे. ही योजना इमारत आणि इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत कामगारांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी आहे.जे बांधकाम कामगार दुसऱ्याचे घर बांधतात पण त्यांच्याजवळ स्वतः चे पक्के घर नाही अशा कामगारांना आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य मिळवून देण्याच्या उद्देशाने, या योजनेतून घरबांधणी किंवा दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.बांधकाम कामगार गृहनिर्माण योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कामगारांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि स्वतःचे घर मिळवण्यासाठी मदत करते.

बांधकाम कामगार गृहनिर्माण योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

बांधकाम कामगार गृहनिर्माण अनुदान योजना ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे (MAHABOCW) राबविली जाते. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट कामगारांना स्थायी निवारा उपलब्ध करून देणे आहे. यामध्ये खालील प्रमुख वैशिष्ट्यांचा समावेश आहे,

  • आर्थिक सहाय्य: नोंदणीकृत कामगारांना घरबांधणीसाठी किंवा घराच्या दुरुस्तीसाठी १ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते.
  • लाभार्थ्यांचा समावेश: बांधकाम कामगार गृहनिर्माण योजना फक्त महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आहे, ज्यामुळे योजनेचा लाभ लक्ष्य गटापर्यंत पोहोचतो.
  • इतर कल्याणकारी लाभ: योजनेच्या अंतर्गत कामगारांना शिक्षण, आरोग्य, आणि विवाहासाठी आर्थिक मदत यांसारख्या इतर सुविधाही मिळतात.
  • ऑनलाइन प्रक्रिया: अर्ज प्रक्रिया सोपी करण्यासाठी कामगार mahabocw.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • सुरक्षा उपाय: योजनेचा लाभ फक्त पात्र कामगारांनाच मिळावा यासाठी कागदपत्रांची काटेकोर पडताळणी केली जाते.

बांधकाम कामगार गृहनिर्माण योजनेसाठी पात्रता निकष

बांधकाम कामगार गृहनिर्माण योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • कामगार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे.
  • गेल्या १२ महिन्यांत किमान ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असावे.
  • कामगार पर्यवेक्षकीय किंवा व्यवस्थापकीय भूमिकेत नसावा

जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर,प्रथम मंडळाकडे नोंदणी करावी लागेल. यासाठी आधार क्रमांक, निवासाचा पुरावा, आणि ९० दिवसांच्या कामाचा पुरावा यांसारखी कागदपत्रे आवश्यक असतात.

योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे?

बांधकाम कामगार गृहनिर्माण अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतींनी करता येते. खालीलप्रमाणे पायऱ्या आहेत.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ mahabocw.in ला भेट द्यावी लागते. संकेतस्थळावर गेल्यानंतर, मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेला ‘Construction Worker Registration’ किंवा ‘बांधकाम कामगार योजना नोंदणी’ हा पर्याय निवडावा.यानंतर नोंदणीसाठी आवश्यक असलेली वैयक्तिक माहिती जसे की – नाव, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि राहत्या पत्त्याचा तपशील भरावा लागतो. त्यानंतर तुम्ही तुमची आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

यामध्ये वयाचा पुरावा, निवासाचा पुरावा, किमान ९० दिवसांचे बांधकाम क्षेत्रातील कामाचा पुरावा तसेच तीन पासपोर्ट आकाराचे फोटो यांचा समावेश होतो.नोंदणीसाठी फार मोठा खर्च नाही. फक्त १ रुपया नोंदणी शुल्क आणि १ रुपया वार्षिक वर्गणी कामगाराला भरावी लागते. सर्व माहिती आणि कागदपत्रे योग्य प्रकारे भरून झाल्यानंतर अर्ज सादर करता येतो.

अर्ज सादर झाल्यानंतर त्याची पडताळणी केली जाते. यावेळी तुम्हाला जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली माहिती आणि कागदपत्रांची खातरजमा करून घ्यावी लागते. त्यानंतरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते आणि कामगाराला मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येतो.

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

जवळच्या कामगार कार्यालयात किंवा माहा ई-सेवा केंद्रात जा. फॉर्म-व्ही (Form-V) घ्या आणि सर्व तपशील भरा. आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म कामगार कार्यालयात सादर करा. पडताळणीनंतर, यशस्वी नोंदणीची माहिती कामगाराला दिली जाते.

बांधकाम कामगार गृहनिर्माण योजनेसंदर्भात काही महत्वाच्या तारखा

नोंदणी: बांधकाम कामगार गृहनिर्माण योजना वर्षभर चालू आहे, त्यामुळे कोणत्याही वेळी नोंदणी करता येते.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: सध्या कोणतीही ठरलेली अंतिम तारीख नाही, परंतु कामगारांनी लवकरात लवकर अर्ज करणे अपेक्षित आहे.

कागदपत्र पडताळणी: अर्ज सादर केल्यानंतर, पडताळणीसाठी कामगाराला जवळच्या सुविधा केंद्रात तारीख निवडावी लागेल.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ५ फेब्रुवारी २०२५ पासून तालुका सुविधा केंद्रांवर डेटा एन्ट्री बंद केली आहे. आता सर्व अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावे लागतील.

यासाठी कामगारांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणाहून अर्ज भरता येईल आणि पडताळणीसाठी जवळच्या केंद्रात भेट द्यावी लागेल. बांधकाम कामगार गृहनिर्माण योजनेच्या तपशीलासाठी mahabocw.in हे संकेतस्थळ तपासावे. तसेच, MahaBOCW मोबाइल अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून योजनेची माहिती आणि अर्जाची स्थिती तपासता येते.

गृहनिर्माण अनुदानाव्यतिरिक्त, बांधकाम कामगारांना खालील लाभ मिळतात,

  • विवाहासाठी आर्थिक सहाय्य: कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी ३०,००० ते ५१,००० रुपये.
  • शिक्षणासाठी शिष्यवृत्ती: पहिली ते उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, विशेषतः मुलींसाठी.
  • आरोग्य सुविधा: वैद्यकीय उपचारांसाठी १५,००० रुपये आणि गंभीर आजारांसाठी अतिरिक्त मदत.
  • अपघात विमा: अपघाती मृत्यूसाठी ५ लाख रुपये आणि अपंगत्वासाठी २ लाख रुपये.
  • निवृत्तीवेतन: ६० वर्षांनंतर १,००० ते ३,००० रुपये मासिक निवृत्तीवेतन.

महाराष्ट्र बांधकाम कामगार गृहनिर्माण अनुदान योजना ही बांधकाम कामगारांना स्वतःचे घर मिळवण्यासाठी एक महत्त्वाची संधी आहे. बांधकाम कामगार गृहनिर्माण योजना कामगारांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थैर्यासाठी उपयुक्त आहे. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर mahabocw.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा जवळच्या कामगार कार्यालयात संपर्क साधावा.

Leave a Comment