महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने २८ जून २०२४ रोजी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू केली. ही योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी राबवली जात आहे. माझी लाडकी बहिण योजना म्हणजे महिलांना दिलासा देणारी योजना आहे.या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. ही योजना २१ ते ६५ या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलांसाठी आहे.
माझी लाडकी बहिण योजनेचे वैशिष्ट्ये
माझी लाडकी बहिण योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य, पोषण आणि कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका देणे आहे. या योजनेतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये (वर्षाला १८,००० रुपये) त हस्तांतरणाद्वारे (DBT) सरळ महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात.याशिवाय, योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी अतिरिक्त आर्थिक मदत आणि दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर सुद्धा उपलब्ध करून देण्याची सरकारची तरतूद आहे. योजनेमुळे राज्यातील सुमारे एक कोटी महिलांना लाभ होणार आहे, ज्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पाला वार्षिक ४६,००० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्रता, अटी व नियम
1.माझी लाडकी बहिण योजनेचा फायदा घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
2.अर्जदार महिला असावी आणि महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी.
3.अर्जदार महिलेचे य २१ ते ६५ वर्षांदरम्यान असावे.
4.अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
5.पिवळे किंवा केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची गरज नाही, परंतु पांढऱ्या रेशन कार्डधारक किंवा रेशन कार्ड नसलेल्यांना उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
6.अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य खासदार, आमदार, सरकारी कर्मचारी किंवा करदाते नसावेत. कुटुंबाकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) नसावे.
माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज कसा करावा?
माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतींनी करता येतो.
माझी लाडकी बहिण योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा करावा?
माझी लाडकी बहिण योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट (ladakibahin.maharashtra.gov.in) वर जा. ‘अर्जदार लॉगिन’ पर्याय निवडा आणि ‘खाते तयार करा’ वर क्लिक करा. मोबाइल क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून नोंदणी करा. आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे पडताळणी करा. अर्जामध्ये आवश्यक तपशील भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सादर करा. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की अर्ज आयडी एसएमएसद्वारे प्राप्त होईल. अशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करा.
माझी लाडकी बहिण योजनेचा ऑफलाइन अर्ज कसा करावा?
अर्जदार अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सेतू सुविधा केंद्र, आशा कार्यकर्त्या, वॉर्ड ऑफिसर किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे अर्ज सादर करू शकतात.
माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना योजनेच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर ‘निवडलेल्या अर्जदारांची यादी’ पर्याय उपलब्ध आहे. तसेच, नारी शक्ती दूत ॲपद्वारेही अर्ज आणि स्थिती पाहता येते. योजनेच्या लाभार्थ्यांना एसएमएसद्वारे अर्जाच्या स्थितीची माहिती दिली जाते. योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने गैर लायकीच्या लाभार्थ्यांना रोखण्यासाठी पडताळणी प्रक्रिया कठोर केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेतर्गत पात्र महिलांनी शक्य तितक्या लवकर अधिकृत वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in वर किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात अर्ज करावा. अधिक माहितीसाठी नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करून किंवा स्थानिक प्रशासकीय कार्यालयांशी संपर्क साधून माहिती मिळवता येईल.