शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ₹२,००० जमा – PM-KISAN योजनेचा २१वा हप्ता लवकरच!

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू झालेली ही योजना देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत त्या शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹६,००० आर्थिक सहाय्य मिळते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये (प्रत्येक ₹२,०००) थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीने जमा केली जाते.

योजनेची मदत केवळ शेतकऱ्यांसाठी आहे. भाडेकरू शेतकरी किंवा कृषी मजूर यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही. सध्या देशभरात अकरा कोटींपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची वैशिष्ट्ये

  • पूर्ण आर्थिक जबाबदारी केंद्र सरकारची : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील सर्व रक्कम केंद्र सरकारकडून दिली जाते. राज्य सरकारांचा योजनेत कोणताही आर्थिक वाटा नाही.
  • शेतीसाठी उपयुक्त वापर : शेतकरी योजनेतून मिळणारी रक्कम बियाणे, खते, कीटकनाशके किंवा सिंचनासाठी वापरू शकतात.
  • पारदर्शक प्रणाली : डिजिटल पद्धतीमुळे कोणतेही मध्यस्थ नसल्याने भ्रष्टाचाराची शक्यता कमी झाली आहे.
  • लाभार्थींची नियमित पडताळणी : प्रत्येक हप्त्यापूर्वी लाभार्थ्यांची यादी तपासली जाते, अपात्र नावे काढली जातात आणि नवीन पात्र शेतकरी जोडले जातात.
  • ई-केवायसी अनिवार्य : शेतकऱ्याची ओळख निश्चित करण्यासाठी आधारकार्डावर आधारित ई-केवायसी प्रक्रिया करावी लागते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंमुळे शेतकऱ्यांना थोडा आर्थिक दिलासा मिळतो आणि पिकांच्या हंगामात लागणाऱ्या खर्चासाठी मदत होते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्रता निकष

  • अर्जदार लहान शेतकरी किंवा सीमांत शेतकरी असावा.
  • शेतकऱ्याच्या नावावर शेती करण्यायोग्य जमीन असावी आणि ती ७/१२ उताऱ्यात नमूद असावी.

खालील व्यक्तींना योजनेचा लाभ मिळत नाही:

  • केंद्र/राज्य सरकारचे अधिकारी किंवा निवृत्त अधिकारी
  • आयकर भरणारे व्यक्ती
  • डॉक्टर, इंजिनियर, वकील यांसारखे व्यावसायिक
  • खासदार, आमदार, महापौर इत्यादी
  • मोठे उद्योगपती, मोठे जमीनदार आणि संस्था

एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ मिळतो.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आणि ई-केवायसी प्रक्रिया काय आहे?

शेतकरी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत नोंदणी करताना ऑनलाइन किंवा ऑफलाइन या दोन्ही मार्गांनी अर्ज करू शकतात.

ऑनलाइन प्रक्रिया : शेतकऱ्यांनी सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.तेथे “Farmers Corner” या विभागात “e-KYC” हा पर्याय निवडावा. त्यानंतर आपला आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करावी. ही प्रक्रिया सोपी असून घरबसल्या पूर्ण करता येते.

ऑफलाइन प्रक्रिया : ज्या शेतकऱ्यांना इंटरनेटची सोय नाही, त्यांनी आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जावे. तेथे बायोमेट्रिक पडताळणी करून e-KYC प्रक्रिया पूर्ण करता येते. ही पडताळणी एकदाच करावी लागते आणि त्यासाठी अत्यल्प शुल्क आकारले जाते.

महत्वाची सूचना :

शेतकऱ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असणे आवश्यक आहे आणि ते खाते NPCI प्रणालीशी जोडलेले असावे. जर नोंद केलेल्या माहितीमध्ये काही चूक आढळली, तर ती संकेतस्थळावरून किंवा जवळच्या कृषी कार्यालयात सहज दुरुस्त करता येते.

हप्त्यांचे वेळापत्रक

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते खालीलप्रमाणे दिले जातात:

  • पहिला हप्ता: एप्रिल – जुलै
  • दुसरा हप्ता: ऑगस्ट – नोव्हेंबर
  • तिसरा हप्ता: डिसेंबर – मार्च

आतापर्यंत एकूण योजनेचे २० हप्ते दिले गेले आहेत.२१ वा हप्ता दिवाळीआधी म्हणजे ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत जमा होणार आहे. या हप्त्यात पात्र शेतकऱ्यांना ₹२,००० मिळतील.प्रत्येक हप्त्यापूर्वी राज्य सरकार लाभार्थ्यांची यादी तपासून केंद्राकडे पाठवते. ही रक्कम शेतकऱ्यांना सणासुदीच्या खर्चासाठी आणि शेतीसाठी मोठी मदत ठरते.

योजनेसंबधी अधिकृत संकेतस्थळे आणि संपर्क

मुख्य संकेतस्थळ: pmkisan.gov.inयेथे ई-केवायसी, लाभार्थी स्थिती आणि नवीन सूचना पाहता येतात.लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी: “Farmers Corner” → “Beneficiary Status” → आधार क्रमांक/मोबाईल क्रमांक टाकून तपासणी करा.पेमेंट स्थिती: PFMS (Public Financial Management System) पोर्टलवर पाहता येते.तक्रारींसाठी: जवळच्या कृषी कार्यालयात किंवा टोल-फ्री हेल्पलाइनवर संपर्क करा.बँक खाते चालू ठेवा आणि मोबाइल क्रमांक कार्यरत ठेवा, जेणेकरून सूचना वेळेवर मिळतील.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकंदर परिणाम

आजपर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून ३ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि शेतीच्या विकासासाठी मोठी मदत ठरली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचे एक मजबूत पाऊल आहे.शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून आणि सर्व माहिती अद्ययावत ठेवून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पूर्ण लाभ घ्यावा.

Leave a Comment