नुकसान भरपाई योजना म्हणजे काय आहे?
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारी ते मे 2025 या वेळेत अवकाळी पडलेल्या पावसामुळे आणि गारपीठ झाल्यामुळे शेती नुकसानीसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. नुकसान भरपाई योजना नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. नुकसान भरपाई योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे.नुकसान भरपाई योजना शेतकऱ्यांसाठी लागू असून, एकूण 15,957 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
नुकसान भरपाई योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी 14 कोटी 99 लाख 62 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून, यामुळे नुकसान भरपाईच्या वितरणात पारदर्शकता आणि गती येणार आहे.
नुकसान भरपाई योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
एप्रिल 2025 मध्ये आलेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे 6,696.25 हेक्टर शेतीचे नुकसान झाले. यासाठी सरकारने 12,215 शेतकऱ्यांना एकूण 11 कोटी 43 लाख 9 हजार रुपयांची मदत मंजूर झाली आहे. त्याचप्रमाणे, मे 2025 मध्ये 1,961.53 हेक्टर क्षेत्रावर झालेल्या नुकसानीसाठी 3,742 शेतकऱ्यांना 3 कोटी 56 लाख 53 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.
ही नुकसानभरपाई थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे कोणताही कोणताही व्यक्ती या प्रक्रियेच्या मधी नसल्याने पैसे थेट आणि पारदर्शकपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील.
सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, नुकसान भरपाई योजनेची मदत रक्कम बँका कर्जवसुलीसाठी वापरू शकणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेची रक्कम पुढील हंगामासाठी बी-बियाणे, खते आणि इतर शेतीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी वापरता येईल.
नुकसान भरपाई योजना अवकाळी पाऊस, गारपीट, पूर, वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीवर लागू आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना संकटातून सावरायला मदत मिळेल.
नुकसान भरपाई योजनेसाठी पात्रता आणि अटी
नुकसान भरपाई योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
- शेतकरी असणे: अर्जदार हा शेतकरी असावा आणि शेतकऱ्याची शेती जमीन नुकसानग्रस्त भागात असावी.
- नुकसानीचा अहवाल: शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाकडे नुकसानीचा अहवाल नोंदवलेला असावा. हा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने सत्यापित केलेला असावा.
- बँक खात्याची माहिती: शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे, कारण नुकसान भरपाई डीबीटीद्वारे जमा होईल.
- नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान: फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस किंवा गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेले असावे.
नुकसान भरपाई योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही विशिष्ट उत्पन्न मर्यादेची आवश्यकता नाही, परंतु नुकसान झालेल्या शेतीचे क्षेत्र आणि शेतकऱ्यांची संख्या यावर आधारित मदत मंजूर केली जाते.
नुकसान भरपाई योजनेचा अर्ज कसा करायचा?
नुकसानभरपाई मिळवण्याची प्रक्रिया सरकारने अगदी सोपी आणि पारदर्शक ठेवली आहे. पाऊस, गारपीट किंवा इतर नैसर्गिक संकटामुळे झालेलं नुकसान स्थानिक तलाठी, ग्रामसेवक किंवा तहसीलदारांना कळवा. अधिकृत पंचनामा झाल्यावर पुढची प्रक्रिया सुरू होते.तुमचा आधार क्रमांक वापरून बायोमेट्रिक ओळख करून घ्या. हे जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा “आपले सरकार” सेवा केंद्रात सहज होतं.नुकसानभरपाईचे पैसे मिळण्यासाठी तुमचं बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेलं असणं गरजेचं आहे. खात्यातील माहिती चुकली असेल तर ती लगेच CSC किंवा “आपले सरकार” केंद्रात दुरुस्त करून घ्या.तुमच्या नुकसानभरपाईची रक्कम मंजूर झाली का आणि खात्यात जमा झाली का, हे पाहण्यासाठी https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus या संकेतस्थळावर जा. तिथे VK नंबर टाकला की पेमेंटचा तपशील तुमच्या समोर येईल.
नुकसान भरपाई योजनेच्या काही महत्वाच्या तारखा
- नुकसानीचा कालावधी: फेब्रुवारी 2025 ते मे 2025 दरम्यान झालेल्या नुकसानीसाठी ही मदत दिली जात आहे.
- मदत मंजुरीची तारीख: 4 ऑगस्ट 2025 रोजी शासनाने मदत मंजूर केली.वितरण प्रक्रिया:
- ऑगस्ट 2025 पासून मदतीचे वाटप सुरू झाले असून, ते लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- आधार प्रमाणीकरणाची अंतिम मुदत: याबाबतची नेमकी तारीख स्थानिक प्रशासन लवकरच जाहीर करणार आहे.
प्रशासनाने शासनाकडे सादर केलेल्या अहवालानुसार, एकूण 8,657.78 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये एप्रिल 2025 मधील 6,696.25 हेक्टर आणि मे 2025 मधील 1,961.53 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. शासनाने या नुकसानीसाठी 14 कोटी 99 लाख 62 हजार रुपये मंजूर केले असून, ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी स्थानिक तहसील कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC येथे संपर्क साधता येईल. याशिवाय, https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus या संकेतस्थळावरून अनुदानाची स्थिती तपासता येईल.
नुकसान भरपाई योजना आपल्याला पुढच्या हंगामासाठी पुन्हा ताकदीने उभं राहायला मदत करणार आहे. म्हणूनच, आपलं आधार जोडलेलं बँक खातं नीट तपासा आणि लागणारी सगळी कागदपत्रं आधीच तयार ठेवा. पिकाचं नुकसान झालं असेल तर ताबडतोब अहवाल नोंदवा आणि आधारची पडताळणी करून घ्या. यासाठी जवळच्या तहसील कार्यालयात, CSC केंद्रात किंवा “आपले सरकार” सेवा केंद्रात जाऊन मदत घ्या.