मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे नेमकं काय?
महाराष्ट्रातल्या अनेक महिलांसाठी सरकारन एक आशेचा किरण घेऊन आली आहे ती म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना. आता या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला थेट बँक खात्यात 1,500 रुपये मिळणार, तेही कोणताही मोठा खर्च न करता.”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने महीला सक्षमीकरणासाठी सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे. ज्या महिला माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र आहे त्या महिलांना सरकार दर महिन्याला 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार-जोडलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. माझी लाडकी बहिण योजना 18 ते 65 वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्पोटीत किंवा निराधार महिलांसाठी आहे.
महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे, आरोग्य आणि पोषण सुधारणा तसेच कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका बळकट करणे असा माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश आहे. नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार, जुलै 2025 च्या हप्त्याची तारीख बदलण्यात आली असून, रक्षाबंधनाच्या निमित्ताने 8 ऑगस्ट 2025 रोजी माझी लाडकी बहिण योजनेची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.
माझी लाडकी बहिण योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये मिळतात, ज्यामुळे वार्षिक 18,000 रुपयांचे आर्थिक मदत मिळते. ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) प्रणालीद्वारे आधार-लिंक बँक खात्यात जमा होते, ज्यामुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित होते. रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर, जुलै आणि ऑगस्ट 2025 चे हप्ते एकत्रितपणे 3,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे महिलांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सणासुदीच्या खरेदीसाठी अतिरिक्त आर्थिक आधार मिळणार आहे.
आतापर्यंत माझी लाडकी बहिण योजनेने 2.41 कोटी महिलांना लाभ दिला आहे, आणि सुमारे 3,600 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. काही महिला, ज्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत 1,000 रुपये मिळवतात, त्या महिलांना माझी लाडकी बहिण योजनेतून 500 रुपये मिळतात, ज्यामुळे एकूण मासिक रक्कम 1,500 रुपये राहते. ही योजना महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक स्थैर्य प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता आणि अटी
माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र व्हायचं असेल तर खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असावी.
- अर्जदार महिलेचे वय 18 ते 65 वर्षे असावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फुरित किंवा निराधार महिला पात्र आहेत. प्रत्येक कुटुंबातून केवळ एका अविवाहित महिलेला लाभ मिळू शकतो.
- अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर आधार-जोडलेले आणि डीबीटी-सक्षम बँक खाते असावे.
या अटींमुळे योजनेचा लाभ खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचेल याची खात्री केली जाते.
माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज कसा करावा?
ज्या महिला दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः काहीतरी व्यवसाय सुरू करू इच्छितात त्या महिलांसाठी माझी लाडकी बहिण योजना एक संधी आहे. म्हणूनच आजच माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज करा.
माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतींनी अर्ज करता येतो.
माझी लाडकी बहिण योजनेचा ऑनलाइन अर्ज पुढील पद्धतीनी करावा.
अधिकृत संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in वर भेट द्यावी. ‘Applicant Login’ पर्यायावर क्लिक करून ‘Create Account’ निवडावे. नाव, मोबाइल क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून नोंदणी करावी. आधार क्रमांक टाकून OTP द्वारे पडताळणी करावी. अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, बँक तपशील आणि निवासाचा पुरावा भरावा. आवश्यक कागदपत्रे (आधार कार्ड, निवासाचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक) अपलोड करावीत. अर्ज तपासून सबमिट केल्यानंतर अर्ज आयडी मोबाइलवर प्राप्त होईल.
माझी लाडकी बहिण योजनेचा ऑफलाइन अर्ज पुढील पद्धतीने करावा.
अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, ग्रामसेवक किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे अर्ज उपलब्ध आहे. तिथे आवश्यक कागदपत्रे सादर करून अर्ज भरावा. केंद्रातील कर्मचारी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करतात. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, निवासाचा पुरावा (रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म दाखला, शाळेचा दाखला), उत्पन्नाचा दाखला (पिवळ्या/केशरी रेशन कार्ड धारकांना आवश्यक नाही), आणि आधार-जोडलेल्या बँक खात्याचा तपशील. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, अर्जाची पडताळणी स्थानिक प्रशासनाद्वारे केली जाते.
गावातल्या सामान्य महिलांना माझी लाडकी बहिण योजनेचा फायदा कसा होतो?
समजा”गावातल्या सुनंदा ताई रोज भाजी विकायला जातात. त्याच्यासाठी घर चालवणं कठीण झालं होतं. त्यांना घर खर्चासाठी व्याजाने पैसे काढावे लागणार होते पण ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा दर महिन्याचा 1,500 रुपये मिळतो, त्यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळालाय.
“तुम्हाला जर माझी लाडकी बहिण योजनेची आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्व माहिती ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लाभार्थी यादी, हप्त्याची स्थिती आणि अर्जाचा दर्जा तपासण्यासाठी ‘Beneficiary Status’ किंवा ‘Payment Status’ पर्यायाचा वापर करता येतो. याशिवाय, नारी शक्ती दूत अॅपद्वारेही अर्ज आणि स्थिती तपासणी करता येते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक स्थैर्य प्रदान करण्यासाठी एक प्रभावी पाऊल आहे. माझी लाडकी बहिण योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी उपयुक्त आहे. पात्र महिलांनी ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा जवळच्या अंगणवाडी केंद्रावर अर्ज करावा. अर्जाची स्थिती आणि हप्त्याचा तपशील नियमित तपासावा. अधिक माहितीसाठी, अधिकृत संकेतस्थळ किंवा हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि आधार-जोडलेले बँक खाते चालू ठेवावे.