नांदेडमध्ये बोगस पीक विमा घोटाळा उघड! ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा, ९ परळीचे; यूपीच्या शेतकऱ्यांच्या ही नावावर फसवणूक

नांदेड: पंतप्रधान पीक विमा योजनेत नांदेडमध्ये मोठा घोटाळा (Crop Insurance Scam) उघडकीस आला आहे. २०२४ पासून ४,४५३ शेतकऱ्यांच्या (Farmers) नावावर ४० सेतू सुविधा केंद्र चालकांनी बोगस पीक विमा काढला. यात बीड जिल्ह्यातील परळीच्या ९ चालकांचा समावेश आहे, तर काहींनी थेट उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावाने फसवणूक केली. सोमवारी रात्री याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

हा घोटाळा परळी, परभणी, पुणे, लातूर, जालना आणि नांदेडमधील सुविधा केंद्र चालकांनी संगनमताने केला. शासनाच्या मालकीच्या, करार नसलेल्या जमिनींवर बनावट कागदपत्रांच्या आधारे पीक विमा काढण्यात आला. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत चालवल्या जाणाऱ्या या योजनेत शेतकऱ्यांची (Farmers) फसवणूक झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
विरोधी पक्षांनी विधानसभेत सरकारवर टीका करत म्हटले, “GST च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून ११ हजार रुपये वसूल केले जातात. सरकार शेतकऱ्यांना काहीच मोफत देत नाही!” या घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास डगमगला असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Leave a Comment